कालचे सुधारकः ताराबाई मोडक (पूर्वार्ध)
१९ एप्रिल १९९२ रोजी, ताराबाई मोडकांची जन्मशताब्दी झाली. ताराबाई थोर शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. पण लक्षात आले की, ताराबाईंचे कार्यच काय, नावही असावे तितके प्रसिद्ध नाही. लोकांचे अशा गोष्टींकडे लक्षच कमी आहे का? असेल. महाराष्ट्राचे सामाजिक सुधारणेसाठी थोडेबहुत नाव आहे. हे कौतुक ऐकायला बरे वाटते. पण त्याच्या मागे शेदीडशे …